शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

CM Eknath Shinde: "जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…"; आनंद दिघेंच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:41 AM

CM Eknath Shinde And Dharmaveer Anand Dighe : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई - धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा आज स्मृतीदिन आहे. याच निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन" असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी लिहिल्याचं दिसत आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  तुमची शिकवण माझ्या मनामध्ये कायम कोरलेली असून मी तुमच्याच तत्वांचे आचरण करत आहे. मी जनसेवेचं व्रत हाती घेतलं असून माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही अशा आशयाची ही पोस्ट आहे. 

"उरात भरुनी सदैव आपले स्मरण,मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…"

आनंद दिघे यांच्या पश्चात... 

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्याचे काम केले. दिघे यांच्या जाण्याने आधार तुटलेल्या शिवसैनिकांना धीर दिला. शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

२००५ मध्ये ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शिवसेना केवळ एकसंध ठेवली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, तर अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद या सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना