शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिणार केंद्र सरकारला पत्र; राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 9:41 AM

मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं.

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान महाराष्ट्राचा अपमान करणारं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री केंद्र सरकारला पत्र लिहितील. अशाप्रकारे पुन्हा विधानं होणार नाहीत असं केंद्र राज्यपालांना कळवू शकतो. मुंबईच्या विकासाठी सर्वांचे योगदान असलं तर मुंबईच्या विकासात सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे ही वस्तूस्थिती आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे असते. परंतु त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही असं म्हणणं म्हणजे मुंबईचा अभ्यास राज्यपालांना नसावा. देशभरात एकूण ४० टक्के कर मुंबईतून दिला जातो. हे सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. मुंबईने सर्वांना आश्रय दिला. कुणीही बाहेरून गुंतवणूक घेऊन इथं आले नाही असंही त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावरून परतल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटतील. मराठी माणसांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री केंद्राला याबाबत पत्र लिहून कळवतील. मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यपाल पदावर असतात तेव्हा वादग्रस्त विधान करणं टाळलं पाहिजे. राज्यपालांच्या अशा विधानानंतर राज्यातील भावना केंद्र सरकारला कळवायला हव्यात. कदाचित राज्यपालांच्या या विधानानंतर केंद्राला पत्र लिहून भावना व्यक्त करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री असतील असंही केसरकरांनी सांगितले आहे. 

काय म्हणाले राज्यपाल?ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यपालांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर