अहमदनगर : शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर फिडर योजना राबविण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथे पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली.राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महाराष्ट्राला दहा हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य देण्यात आल्याचे सांगितले. ८०० ते ९०० शेतकऱ्यांना एकत्रित करून एक सोलर फिडर तयार करण्यात येईल. एमइआरसीने ठरवून दिलेले शेतीसाठीचे दर प्रतियुनिट जवळपास सव्वा रुपया शेतकऱ्यांनी भरणे आवश्यक आहे. योजनेसाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
१२ तास विजेसाठी मुख्यमंत्री सौर फीडर योजना
By admin | Published: April 20, 2017 5:55 AM