सिंधुदुर्ग: एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलं आहे. यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं चित्रदेखील वारंवार दिसलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत. एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं. एल्गार प्रकरणाचा तपास केंद्रानं एनआयएकडे सोपवल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या १६ मंत्र्यांची बैठक बोलावली. यानंतर एल्गार प्रकरणाचा समांतर तपास राज्य सरकार एसआयटी नेमून करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणावरुन निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. कोरेगाव भीमाचं प्रकरण दलित बांधवांशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.'कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपा करुन कोणीही गैरसमज करुन घेऊ नका,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.आजच्या महत्त्वाच्या बातम्याशिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधानमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरूडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेशChina Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:54 IST
कोरेगाव-भीमा, एल्गार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री
ठळक मुद्देकोरेगाव-भीमा आणि एल्गार प्रकरण हे दोन वेगवेगळे विषय- मुख्यमंत्रीकेंद्रानं एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला, कोरेगाव-भीमाचा नाही- मुख्यमंत्रीकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही