‘त्या’ १२ जणांच्या नावावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:14 PM2021-09-01T20:14:51+5:302021-09-01T20:24:41+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावाची यादी दिली होती.

CM Uddhav Thackeray, DCM Ajit Pawar, Balasaheb Thorat Meet to Governor Bhagat Singh Koshyari | ‘त्या’ १२ जणांच्या नावावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

‘त्या’ १२ जणांच्या नावावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

Next

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त असून अद्याप यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. जवळपास ८ महिने उलटूनही १२ जणांच्या नावावर अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. राज्यपाल नियुक्त जागा लवकर घोषित व्हाव्यात यासाठी मविआ नेत्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. परंतु हायकोर्टानं अपेक्षित निर्णय न दिल्यानं अद्यापही ही यादी रखडली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावाची यादी दिली होती. या यादीतील काही नावावर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकरण सोडवण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. या भेटीत १२ जणांच्या नावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील काही नावांवर आक्षेप; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार?



 

आक्षेप असणारी नावं वगळण्याची शक्यता  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असं सांगितले. तर महाविकास आघाडी त्यांनी दिलेल्या यादीवर ठाम राहिल का? कारण राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीच्या यादीवर ठाम राहिले तर आणखी काही काळ ही नावं घोषित होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र विधान परिषदेत आपापलं संख्याबळ वाढवण्यावर तिन्ही पक्षांनी भर देत काहीतरी तडजोडीची भूमिका घेतली तर लवकरच ही यादी घोषित केली जाईल.

कोणती १२ नावांची यादी सरकारने दिलीय?

काँग्रेस – सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन(समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर

राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे(सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी(सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक) आनंद शिंदे(कला)

शिवसेना - उर्मिला मातोंडकर(कला), नितीन बानगुडे-पाटील(साहित्यिक), विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी

आक्षेप असणारी नावं?

सचिन सावंत, काँग्रेस

एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस

नितीन बानगुडे पाटील, शिवसेना

Web Title: CM Uddhav Thackeray, DCM Ajit Pawar, Balasaheb Thorat Meet to Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.