मुंबई: राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास महाराष्ट्र सक्षम आहे. परंतु, केंद्राकडून जसजसा पुरवठा होईल, तसे लसीकरण केले जाईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका. लसीकरण केंद्रे कोव्हिड प्रसारक मंडळं होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली आहे. (cm uddhav thackeray requested people to do not rush at corona vaccination centre)
राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसची आवश्यकता असून, ते एकरकमी चेकने घेण्याची तयारी केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”
तर लसीकरण केंद्र कोरोना प्रसारक मंडळ होतील
देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. केंद्र सरकार जसजसा लसींचा पुरवठा करेल, तसे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाईल. राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होईलच. मात्र, थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. कोरोना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी पाहता, लसीकरण केंद्रे कोरोना प्रसारक मंडळे होतील की काय, अशी शक्यता वाटते. त्यामुळे कोरोना केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले.
देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू, पण उत्तरदायित्व शून्य: राहुल गांधी
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार की नाही, याबाबतच्या चर्चांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला असून, १ मे रोजी पहिली लस दिली जाणार आहे. माझे वचन आहे की, माझ्या नागरिकांचे लसीकरण पेलायला आपले सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका
लसीकरणात महाराष्ट्र देशात आघाडीवर
कोरोना लसीकरणात संपूर्ण देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ३० एप्रिल रोजी राज्याला ३ लाख डोस मिळाले. तसेच मे महिन्यात लसींचे १८ लाख डोस मिळणार आहेत. नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सक्षम असले, तरी पुरवठ्याची मर्यादा आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे नाव न घेतला काढला.