शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 5:12 PM

जळगाव येथे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

जळगाव: राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रथमोपचार असून शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

जैन इरिगेशन लि. तर्फे देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र पुरस्कार वितरण सोहळा आज दुपारी जैन हिल्स येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. नंदापूर, ता. जि. जालना येथील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कवी पद्मश्री ना. धो. महानोर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, प्रतिभाताई पवार,  चंद्रकला दत्तात्रय चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, भारताला बलशाली करण्यासाठी ‘शेती आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे’ हा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी सांगितलेला विचार कृतीत आणण्यात येईल. शेती क्षेत्रात बदल घडून येत आहेत. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. हे बदल कौतुकास्पद आहेत. शेतकऱ्यांनी निश्चय करून बदल स्वीकारले पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगती करीत बदलाचे वारे देशभर पोहोचवावेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पवार म्हणाले, अप्पासाहेब पवार यांनी शेती, पाणी, माती यांचा अभ्यास करीत उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. आता शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न शेतकरी घेवू शकतील. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा हा परिसर आहे, असेही त्यांनी सांगितले.  

गुलाबराव पाटील म्हणाले की, देशातील केळीच्या क्षेत्रापैकी 20 टक्के क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. 49 हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे तेलबिया संशोधन मंडळाच्या जागेत केळी संशोधन केंद्र कार्यान्वित करावे. प्रलंबित वीज जोडण्यांसाठी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

पुरस्कारप्राप्त शेतकरी चव्हाण यांनी सांगितले, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. पाणलोट क्षेत्र विकास केला. त्यामुळे फळबागांची लागवड करणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.   जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव