मुंबई : कोरोना महामारीत विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये. नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करता येईल. परंतु यासाठी देशपातळीवर एकच निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.कोरानाचे संकट किती काळ राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, असे सांगून ठाकरे म्हणाले, वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबतही निर्णय व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांची तोंडी परीक्षा घ्यावी. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास कोरोना युद्धात त्यांची मदत घेता येईल.पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधून कोरोनाविषयीची सद्यस्थिती जाणून घेतली.कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाहीमहाराष्ट्राने कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणले. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.राज्यात साथरोग नियंत्रण रुग्णालयमहाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना नंतर अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविले तर देश जिंकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ठाकरेंची मोठ्या भावाकडे महत्त्वाची मागणी; पंतप्रधान मोदी सकारात्मक प्रतिसाद देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 6:27 AM