शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

गाफील राहू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सल्ला; कोल्हापूरसाठी आघाडीची रणनीती ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:34 AM

‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र, आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते.

कोल्हापूर : कोल्हापूूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावेच लागेल, असा आदेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिला. गाफील राहू नका, ताकदीने कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले.‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र, आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते. जयश्री जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे आघाडीच्या पातळीवर काहीशी संभ्रमावस्था पसरली होती. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवले.सोमवारी दुपारी मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर व संजय पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली.त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार राऊत, अरुण दुधवडकर, संजय पवार, राजेश क्षीरसागर यांच्यासोबत चर्चा केली. जयश्री जाधव या काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचा उमेदवार म्हणून ताकदीने कामाला लागा. गाफील राहू नका, कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जयश्री जाधव यांना निवडून आणावेच लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सुमारे अर्धा तास बैठक झाली.जाधव यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर येऊजयश्री जाधव यांना आमदार करण्यासाठी दिवसरात्र एक करू, त्यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, अशी ग्वाही राजेश क्षीरसागर व संजय पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना