शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
3
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
4
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
5
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
6
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
7
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
8
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
9
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
10
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
11
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
12
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
13
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
14
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
15
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
16
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
17
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
18
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
19
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
20
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...

Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 6:58 AM

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचविण्याला असल्याचे सांगत यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला आम्ही प्राधान्य दिले, हा संदेश जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधाचे सूर उमटले असून, भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (No Dahi Handi In Maharashtra This Year)

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचा निर्णय  हा समाजहिताचा असल्याने आम्ही त्याचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पत्रकारांना दिली. जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम यांनी मागणी केली की, मुख्यमंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी द्यावी. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला असून, घाटकोपरमध्ये आम्ही दहीहंडी फोडणारच, असे सांगितले.

काहीही असो, थरथराट नाहीच श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्याच ठिकाणी कमी उंचीची दहीहंडी फोडली जाईल.  कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सहभागी करून घेऊ, गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळे घेतील, अशी भूमिका गोविंदा पथकांच्या समन्वय समितीने बैठकीत मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

अनुभव कटू आहे...गेल्या दोन लाटांत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबेच्या कुटुंबे अनाथ झाली. त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटांतील आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाहीतर, जगाचा अनुभवही कटू आहे. दोन डोस दिलेल्या देशांतही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.  

कोरोना निर्बंधांविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा काही जण करतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल. सगळे सण-उत्सव  घरात राहून साजरे केले. शासनाला सहकार्य केले तसेच यापुढेही केले पाहिजे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून, तो वेगाने पसरत आहे. दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती असेल.- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स

दहीहंडी उत्सवात तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.- इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

दहीहंडीचे प्रकरण न्यायालयात असताना, ‘दहीहंडी काय गोविंदांनी पाकिस्तानात जाऊन फोडायची का’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना दहीहंडी उत्सवाला मनाई करणे दुर्दैवी आहे.- आशिष शेलार, भाजपचे नेते

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे