Uddhav Thackeray in Baramati: बारामतीच्या उबवणी केंद्रावरून उद्धव ठाकरेंचे भाजपावर वार; म्हणाले, विघ्न आणू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:37 AM2021-11-03T08:37:50+5:302021-11-03T08:38:22+5:30

Uddhav Thackeray in Baramati: आम्हीही २५-३० वर्षे नको ती अंडी उबविली, पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप-सेना युतीवर भाष्य केले.

CM Uddhav Thackreay target BJP in Baramati; Sharad Pawar build Indias Biggest incubation center pdc | Uddhav Thackeray in Baramati: बारामतीच्या उबवणी केंद्रावरून उद्धव ठाकरेंचे भाजपावर वार; म्हणाले, विघ्न आणू नका!

Uddhav Thackeray in Baramati: बारामतीच्या उबवणी केंद्रावरून उद्धव ठाकरेंचे भाजपावर वार; म्हणाले, विघ्न आणू नका!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : ‘राजकारणातही इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. २५ ते ३० वर्षे आम्ही ते उघडले होते. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबविली. पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप-सेना युतीवर भाष्य केले.

येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या आवारातील अटल इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ते म्हणाले, पवारसाहेब आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे. राजकारण असतं, पण ते चांगल्या कामात आणू नये. पाठिंबा देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. 

शरद पवार म्हणाले की, देशातील ८१ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरच्या आत जमीन आहे. त्यापैकी ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. ही शेती घर चालवू शकणार नाही. त्यासाठी शेतीपूरक व्यवसायावर भर देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सेंटरच्या माध्यमातून युवकांमध्ये संशोधनवृत्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक बाबा कल्याणी, अतुल किर्लाेस्कर यांचीही भाषणे झाली. यावेळी रश्मी ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आदी उपस्थित होते.

...पण धूर काढू नका
- कुणी म्हणतायत फटाके फुटणार आहेत, फटाके फोडा; पण धूर काढू नका. कोरोना अजून गेला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
- शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखविला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचे काम अविरत सुरू आहे. आज देशातले सर्वांत मोठे इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासाने काम करतंय’, असे ते म्हणाले.

Web Title: CM Uddhav Thackreay target BJP in Baramati; Sharad Pawar build Indias Biggest incubation center pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.