ऑनलाइन लोकमतधुळे, दि. ६ : राज्यातील काळी-पिवळी चालकांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला असून १२+१ वाहतूक क्षमता वाढीस लवकरच परवानगी दिली जाणार आहे़ तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून तोपर्यंत काळी-पिवळीवर होणाऱ्या कारवार्इंना स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली़
राज्यातील काळी-पिवळी धारकांना सध्या ६+१ अशी प्रवासी वाहतूक मर्यादा लागू आहे़ मात्र इतके कमी प्रवासी घेऊन व्यवसाय करणे कालीपीली धारकांना परवडत नसल्याने अवैध प्रवासी वाहतूकीला राज्यभरात ऊत आला आहे़ प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याची मागणी टॅक्सी चालक मालक संघटनांनी सातत्याने केली होती़ त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आमदार अनिल गोटे यांच्या मागणीनंतर प्रवासी वाहतूक मर्यादा वाढीस हिरवा कंदील दाखविला असून तसा प्रस्ताव मागविला आहे़ तोपर्यंत कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे़