कऱ्हाड : सहकार विभागाच्या सर्वेक्षणात आढळलेल्या राज्यातील ५४ हजार बोगस सहकारी संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापुढील टप्प्यात सहकार विभागत्तर्फे सहकारी संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.चरेगावकर म्हणाले, सहकार खात्याकडे नोंदणी केलेल्या सुमारे २ लाख ३० हजार सहकारी संस्था आहेत. ५४ प्रकारच्या संस्थांना एक प्रकारचेच नियम वापरले जातात. प्रत्यक्षात त्यांची धोरणे, कामकाज पूर्णत: भिन्न आहे. त्यांचा विचार करून सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राज्य सहकार खात्याचा सल्लागार म्हणून काम करताना अनेक सूचना सहकार विभागाला केल्या आहेत. सहकाराच्या माध्यमातून प्रगती साध्य करण्यासाठी अनेक पारदर्शी निर्णय झाले आहेत. सहकारी संस्थांची तपासणी करण्यासंदर्भात १७ जून २०१५ला कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी संस्थेच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्यावर अंकुश ठेवला जाणार आहे.
सहकारी संस्थांची तपासणी होणार
By admin | Published: December 30, 2015 12:33 AM