शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

अंबाबाई मूर्तीवर आजपासून कोटिंग

By admin | Published: July 31, 2015 1:09 AM

अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. श्री जगदंबेच्या राज्याचा कोतवाल आणि करवीर क्षेत्रातील सर्वांच्या खऱ्या-खोट्याचा हिशेब ठेवणाऱ्या रंकभैरवाला उद्देशून रंकभैरव विधान संपन्न झाले. अंबाबाई मूर्ती स्वच्छतेनंतर गेले दोन दिवस मूर्तीचे अंतर्गत मजबुतीकरण करण्यासाठी ‘इथिल सिलिकेट’ हे रसायन इंजेक्शनद्वारे सोडण्यात आले. ही प्रक्रिया अतिशय संथगतीने होते. एक प्रक्रिया पूर्ण होऊन ती वाळल्यावर पुढची प्रक्रिया सुरू केली जाते. आजपासून मूर्तीला बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंग करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवस चालेल. त्यानंतर दुर्वांचा रस वापरून कोटिंग केले जाईल. कोल्हापुरातील प्रख्यात संस्कृत अभ्यासक वि. गो. देसाई यांनी श्रीदेवी भागवत नवाह पारायण केले तसेच श्रीदेवी भागवत कथा निरूपणकार श्री विश्वास घोडजकर यांचा पंडित राजेश्वर शास्त्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)