शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

By admin | Published: October 06, 2015 3:13 PM

भाजपा विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. 
गेल्या आठवड्यात कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक ( १ नोव्हेंबर)  तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली मात्र तरीही शनिवारी डोंबिवलीत पार पडलेल्या भाजपच्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी ५६०० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. तसेच यापूर्वीही वगळलेल्या २७ गावांसाठी १२०० कोटींचे विशेष पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. निवडणूक आयोगानेही त्याची दखल घेत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना प्रलोभने दाखविता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. आचारसंहितेचा भंग झाला का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विधान तपासून अहवाल मागवण्यात येईल असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.