पुणे : पश्चिम किनारपट्टीवर आलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढू लागला असून, किमान तापमानात पुन्हा एकदा घट होऊ लागली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १०़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली होती़ पुण्यात १६ जानेवारीला किमान तापमानात १५़२ अंशापर्यंत वाढ झाली होती़ त्यात गुरुवारी घट होऊन किमान तापमान ११़८ अंशापर्यंत खाली आहे़ पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ११़८, अहमदनगर ११, जळगाव १३़६, कोल्हापूर १५़९, महाबळेश्वर १३़२, मालेगाव १४़२, नाशिक १२़६, सांगली १६़१, सातारा १४, सोलापूर १४़३, मुंबई २०़२, अलिबाग १८़६, रत्नागिरी १९़४, पणजी २०़४, डहाणू १७़७, भिरा १७़५, उस्मानाबाद १०़५, औरंगाबाद १३़२, परभणी १३़१, नांदेड १५, बीड १६, अकोला १६, अमरावती १३, बुलढाणा १५़८, ब्रह्मपुरी १४़५, चंद्रपूर १४़८, नागपूर १३़५, वाशिम १३़६, वर्धा १४, यवतमाळ १४़
थंडीचा पुन्हा अंमल सुरू
By admin | Published: January 20, 2017 12:27 AM