मुंबई : राज्य थंडीने काही अंशी का होईना गारठले असतानाच दुसरीकडे मुंबईकरांना मात्र ऊन आणि उकाड्याने घाम फोडला आहे. बुधवारी राज्यात अहमदनगर येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नगरचे किमान तापमान १० अंश नोंदविण्यात आले असतानाच मुंबईचे कमाल तापमान ३५.५ अंश नोंदविण्यात आले आहे. परिणामी, राज्यात गारठा तर मुंबईत उकाडा अशी स्थिती असून मुंबईकर अद्याप थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता २९, ३० डिसेंबर रोजी किमान तापमान ३६, २० अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)मुंबई १९.६अलिबाग २०रत्नागिरी १९पणजी २१.२डहाणू २०.५पुणे ११.४अहमदनगर १०जळगाव १५कोल्हापूर १६.८महाबळेश्वर १४.६मालेगाव १४.८नाशिक ११.६सांगली १३.३सातारा १२.९सोलापूर १७.५औरंगाबाद १०.६परभणी १२.७नांदेड १५अकोला १३.३अमरावती १४.२बुलडाणा १५.४चंद्रपूर १५.४गोंदिया १३.५नागपूर ११.३वर्धा १२.५यवतमाळ १२.४