पुणे : विदर्भापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात मोठी घट झाली असून तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़. राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे ६़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिक सध्या हिवाळा सरत असताना थंड दिवसांचा अनुभव घेत आहेत़. देशात ओडिशा, मध्य प्रदेश आणि विदर्भात थंडीची लाट आली असून मध्य प्रदेशातही अनेक ठिकाणी दिवसभर थंड वातावरण आहे़. गोव्यासह संपूर्ण राज्यात कोरडे हवामान असल्याने सायंकाळ होताच थंडीचा कडाका जाणवत आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे़. १ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. इशारा : विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता़ आहे़ .३० जानेवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता आहे़. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ८़७, लोहगाव ११़.४, अहमदनगर ७़.२, कोल्हापूर १६़.५, महाबळेश्वर १०़.६, मालेगाव ८़.६, नाशिक ७, सांगली १४़.१, सातारा १३, सोलापूर १३़.६, मुंबई १९, सांताक्रूझ १९़.२, अलिबाग १७़.४, रत्नागिरी १९़.८, पणजी २१़.४, डहाणु १३़५, उस्मानाबाद १०़७, औरंगाबाद ७़९, परभणी ८़.२, नांदेड ११़.५, बीड ९़.६, अकोला ६़.८, अमरावती ९़.४, बुलढाणा ७़.६, ब्रम्हपूरी ७़.७, चंद्रपूर ९़.४, गोंदिया ७़.२, नागपूर ६़.५, वाशिम ८़.४, वर्धा ९, यवतमाळ ६़.४़़़़़़़़़़़़विदर्भात दिवसाही गारवाविदर्भात किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे़. तेथील अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलने ३ ते ७ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़. गोंदिया येथे कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ७़३ अंश सेल्सिअसने कमी आहे़.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही थंडीची लाट ; विदर्भात दिवसाही गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 1:02 PM
राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे ६़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़.
ठळक मुद्देविदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता १ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता