शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

महाविद्यालयीन तरुणाचा खून

By admin | Published: March 29, 2017 2:49 AM

किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला़

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासांत दोघांना अटक केली आहे़ आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (वय २०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़गौरव रामचंद्र जाधव (वय २१, रा़ सिंहगड इन्स्टिट्यूट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मूळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ या प्रकरणात मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली़ तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना सोमवारी रात्री गौरव जाधव याचा मृत्यू झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मूळ गावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, श्रीकांत शिंदे, तपास पथकाचे उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळविले़या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले़ गुन्ह्यात वापरलेला बांबू हस्तगत करायचा आहे़ गुन्हा करण्याचा मुख्य उद्देश काय, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (प्रतिनिधी)किरकोळ कारणावरून बाचाबाचीअभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोश बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्व जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदव्यांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्रांचा वाढदिवस साजरा करून रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यावर बसले होते़ आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ ते गप्पा मारत बसले असताना एकाने त्यांची ओळख करून दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरून त्यांच्यात व आशिष पवार यांच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ तेव्हा आभिजित शिंदे यांचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़ या बाचाबाचीचा राग मनात धरून आकाश डोके हातात बांबू घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यात बांबूने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबूने मारहाण केली़ ते पाहून शिंदे पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलावून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबूने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़