मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा केली. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू करण्यात येतील. यंदाच्या वर्षी ७५ टक्के उपस्थितीचं बंधन नसेल, अशी महत्त्वाची माहिती सामंत यांनी दिली.राज्यातील महाविद्यालयात सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून काही दिवसांपासून केली जात होती. यासंदर्भात काही बैठकादेखील पार पडल्या. त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत महाविद्यालयं सुरू करत असल्याची घोषणा केली. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरू करण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार; ७५% उपस्थिती बंधनकारक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:01 PM