मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी होता, असे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत विशेष एनआयए न्यायालयाने पुरोहितचा जामीन फेटाळला.मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपींवरील मकोका हटवला आहे. तपास यंत्रणेने त्याला यूएपीएअंतर्गत (बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा) अटक करण्यासाठी लष्कराकडून मागितलेली परवानगी कायद्याला अनुसरून नसल्याचा दावा करत कर्नल पुरोहितने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. (प्रतिनिधी)पुरोहितविरोधात पुरावे...एनआयएने यावर आक्षेप घेत कर्नल पुरोहितची या हल्ल्यात काय भूमिका होती, त्याने अभिनव भारत ही संघटना कशा प्रकारे स्थापन केली, शस्त्रे व स्फोटके मिळवण्यातही त्याचा हात होता, हे विशेष न्यायालयाला सांगितले. एनआयएचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सकृतदर्शनी पुरोहितविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याचा या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले. याच आधारावर एनआयए न्यायालयाने पुरोहितचा जामीन अर्ज फेटाळला. नाशिकमधील मालेगाव येथे सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.
कर्नल पुरोहितचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 27, 2016 5:34 AM