शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

रोडपालीतील खाडीचा रंग बदलला

By admin | Published: January 18, 2017 3:07 AM

तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- तळोजा एमआयडीसीमधील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जाते. हे पाणी रोडपालीला खाडीला मिळते. त्यामुळे खाडीचा काही भाग पूर्णपणे काळा झाला असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.प्रदूषित पाण्यामुळे मँग्रोज, मासे तसेच जलचरांवर परिणाम होत आहे. याबाबत प्रदूषण महामंडळाकडे वारंवार तक्र ार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. येथील काही कारखाने रसायनमिश्रित पाणी सीईटीपीला न देता पावसाळी नाल्यात सोडतात. ते पाणी पाताळगंगा नदीला जावून मिळते. काही कारखाने थेट नदीपात्रात सांडपाणी सोडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वादाच्या भोवऱ्यात असलेले औद्योगिक सांडपाण्यावरही शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्रि या न करता ते कामोठे खाडीत सोडले जाते. यात घातक रसायने असल्याने उग्र वास येतो. यामुळे रोडपालीत राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा-लिंक रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याचे येथील रहिवासी सुनील गोतपगार यांनी सांगितले. टोलेजंग इमारतीत लाखो रूपयांची गुंतवणूक करून या ठिकाणी घर खरेदी केले. मात्र रात्रीच्या वेळी आपण नेमके एमआयडीसीत राहतो की वसाहतीत असा प्रश्न पडत असल्याची प्रतिक्रिया सागर वीरकर या रहिवाशाने दिली. रोडपाली येथे नवी मुंबई पोलीस मुख्यालय आहे. तिथे जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी काम करतात. त्यांनाही खाडीतून येणाऱ्या उग्र वासाचा त्रास होतो. डोळ्याला चुरचुरणे, डोकेदुखी आदी तक्रारी येत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्याही त्याच तक्र ारी आहेत. पाताळगंगा नदी व कामोठे खाडीत दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होत आहे. तसेच पाण्यातील इतर जलचर व वनस्पतींवर परिणाम होतो. रसायनयुक्त पाण्यामुळे सध्या कामोठे खाडी पूर्णपणे काळी झाली आहे. कुठेच पाणी दिसत नाही, चारही बाजूने रसायनाचा तवंग नजरेस पडतोय. पनवेल-सायन महामार्गावरून जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होतो. कित्येक ठिकाणी मँग्रोज जळालेले दिसते. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघड चालला आहेच. इतकी गंभीर वस्तुस्थिती असतानाही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. ।रोडपालीमधील सर्वच रहिवासी उग्र वासाने त्रस्त आहेत. सकाळी धूर, धुके आणि प्रदूषणामुळे तर श्वास घेणेही कठीण जाते. येथील रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. - चंद्रकांत राऊत, अध्यक्ष, रोडपाली एकता सामाजिक सेवा संस्थासध्या या विभागाचा पदभार माझ्याकडे नाही. रासायनिक सांडपाण्यामुळे पाताळगंगा व कासाडी खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. मात्र याबाबत अद्याप तक्रार नाही, काही तक्रारी आल्यास त्याबाबत निवारण करण्यात येईल. - तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ