शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

सत्ता स्थापनेवरून खिल्ली, राग, समर्थन, विरोध, सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:05 AM

शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅप्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी खिल्ली, राग, समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.

मुंबई : शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅप्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी खिल्ली, राग, समर्थन आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. दिवसभर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती.शनिवारची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारी ठरली. मतदारराजा झोपेमध्ये असताना शनिवारी राजकीय भूकंप झाला. राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीने पार पडल्याची माहिती समोर आली आणि चर्चांना उधाण आले.‘काकांनी पावसामध्ये कमावले’, ’पुतण्याने रातोरात गमावले’, ’महाराष्ट्राची झोपेतच हत्या’, ‘पाठीत खंजीर खुपसला हे फक्त ऐकत आलो होतो, आता प्रत्यक्षात बघतोय’, ‘आता भाजप आणि राष्ट्रवादीचे भक्त कार्यकर्ते...’, ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’, ‘मी पुन्हा येईन - मी पुन्हा येईन, वाटलं नव्हतं सकाळी सकाळी येईन’, ‘भाजप पहिल्या दिवसापासून म्हणत होते, वेट अ‍ॅण्ड वॉच म्हणून, आता समजलं वॉच म्हणजे घड्याळ’, अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिवसभर चर्चेत होत्या.राजकीय रंग...काहींनी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणीही केली, तर शनिवारी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे तर काही खिल्ली उडवणारे विनोद सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहींनी सोशल मीडियावरून आपला राग व्यक्त केला. तर काहींनी भाजपच्या निर्णयाचे समर्थनही केले, काहींनी विरोध दर्शवला. त्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया