शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

आले तर सोबत नाहीतर एकट्याने; भाजपची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 5:55 AM

फडणवीस यांचा चार दिवसांत शपथविधी

मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेना सोबत आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारचा किंवा सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रतिसादाची अखेरपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत तिढा सुटला नाही तर २०१४ प्रमाणे केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी करावा, असे भाजपमध्ये ठरले असल्याचे समजते. मात्र त्यापूर्वी शिवसेनेने मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सूत्रांनी सांगितले की, ते प्रयत्न सफल झाले किंवा अपयशी ठरले तरी ७ नोव्हेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी करायचा, असे भाजपचे ठरले आहे.

भाजपने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे देऊ केली आहेत. तथापि नगर विकास, वित्त आणि गृह ही खाती मात्र देण्यास सपशेल नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना सत्तेत सहभागी होत असल्याचे दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या दोनच मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर शपथ घ्यावी आणि इतर मंत्री व खात्यांसंदर्भात चर्चा सुरू ठेवून लगेच काही दिवसांत विस्तारामध्ये शिवसेनेचे आणखी मंत्री सामावून घ्यावेत, असाही एक प्रस्ताव भाजपकडून दिला जाऊ शकतो.

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल - मुख्यमंत्रीसरकार लवकरच स्थापन होईल. सध्याचे सरकार काळजीवाहू आहे. या सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत. तरीही, नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करीत आहोत. महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्तास्थापनेचा तिढा सोडवून, लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर दिली. 

 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना