सातारा : विनयभंग प्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने गुरुवार, दि. १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोरे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.सुमारे दीड महिन्यापूर्वी आ. गोरे यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘आयटी अॅक्ट’चा गुन्हा दाखल झाला आहे. आ. गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळून उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना सहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. उच्च न्यायालयामध्ये दोनवेळा सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर तिसऱ्या सुनावणीवेळी जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. परंतु मंगळवारी सकाळी ते स्वत:हून शहर पोलिस ठाण्यात हजर झाले.दुपारी सव्वा दोनला त्यांना जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)
आ. जयकुमार गोरेंना तीन दिवस पोलीस कोठडी
By admin | Published: January 11, 2017 4:25 AM