शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

सेनेचे बिहारमध्ये ‘एकला चलो’!

By admin | Published: September 21, 2015 1:58 AM

केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत

पाटणा/ मुंबई : केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत १५० उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी पाटणा येथे ही घोषणा केली. बिहारमध्ये सेनेची संघटनात्मक बांधणी नाही. त्यामुळे तेथे सेना फारच तुरळक जागा लढवत होती. महाराष्ट्रात जाणाऱ्या बिहारी माणसांच्या विरोधात असलेला अशी पक्षाची तिकडे ओळख आहे. केंद्रात व महाराष्ट्रात सत्तेत भागीदार असूनही त्यांना रालोआत सहभागी करून घेण्याबाबत साधी चर्चाही केली नाही. ही बाब शिवसेनेला खटकली असून, जुने-नवे हिशेब चुकते करण्याकरिता शिवसेना १५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र हिंदुत्व, गरिबी व रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री घेऊन शिवसेना ही निवडणूक लढवणार असून, २५ जागा लढवणाऱ्या एमआयएमच्या धार्मिक प्रचाराला विरोध करण्याकरिता ‘अखंड भारत’ असे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.रालोआचा घटक असलेली शिवसेना बिहारात एकटी का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे राऊत यांनी टाळले. शिवसेना हिंदी भाषिक प्रदेशांत आपला जनाधार वाढवून येथील लोकांना आपली शक्ती देऊ इच्छिते. म्हणून आम्ही येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. ओवैसी एक ‘विष’ असदुद्दीन ओवैसी यांच्या आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षानेही बिहार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णयघेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘अमृता’सोबत ‘विषा’ची कुठलीही चर्चा व्हायला नको. ओवैसी एक ‘विष’ असून, त्यांच्यासारखे लोक राजकारणात आले तर देश पुन्हा एकदा तुटेल, असे वादग्रस्त विधानही राऊत यांनी केले.युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार निवडणुकीची धुरा स्वत: सांभाळणार असून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता त्यांनी खासदार संजय राऊत व अनिल देसाई यांना धाडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार करतील तेव्हा आदित्य बिहारच्या मैदानात उतरलेले असतील!