मुंबई : २८ आॅगस्ट २०१५च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त ठरणाऱ्या इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये समायोजन न करता सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत शाळेतच संरक्षण दिले जाईल, असा शासन निर्णय शनिवारी शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.या निर्णयाने राज्यातील शेकडो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना संरक्षण मिळेल, पूर्वी मुख्याध्यापकांची सेवा पूर्णपणे वाया जाणार होती. वेतननिश्चितीत तफावत झाली असती, असे शिक्षक परिषदेचे मुंबई अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अतिरिक्त मुख्याध्यापकांना दिलासा
By admin | Published: July 04, 2016 4:53 AM