रवींद्र साळवे,
मोखाडा- शनिवारी सकाळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कळमवाडी येथील कुपोषणाचे बळी ठरलेल्या सागर वाघ व खोच येथील ईश्वर सवरा यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी बाल विकास, आदिवासी विकास व आरोग्य या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून राज्याचे मुख्य सचिव व अधिकाऱ्यांसह संबधित मंत्र्यांवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच सवरांच्या बेजबाबदार वक्तव्यावर त्यांनी प्रखर टीका केली २५ रुपयात गरोदर आणि स्तनदा मातांना पोटभर आहार देणाऱ्या अमृत आहार योजनेतून अंडी दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त करत २५ रुपयात दोन वडापाव तरी मिळतात का असा सवाल उपस्थित केला. जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे भरली जावीत असे म्हटले.