शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

माझ्या धोरणांवरील टीका अर्थशास्त्रीय आधाराविना

By admin | Published: July 18, 2016 4:43 AM

माझ्या कारकिर्दीत पतधोरण ठरविताना विकासापेक्षा चलनवाढ रोखण्यावर नको तेवढा भर दिला या टिकेला काही अर्थशास्त्रीय आधार नाही.

मुंबई : माझ्या कारकिर्दीत पतधोरण ठरविताना विकासापेक्षा चलनवाढ रोखण्यावर नको तेवढा भर दिला या टिकेला काही अर्थशास्त्रीय आधार नाही. मी या टिकेकडे केवळ चर्चा-संवाद म्हणूनच पाहतो व त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी निंदकांना सडेतोड उत्तर दिले.डॉ. राजन म्हणाले की, चलनवाढ आणि महागाई आता आटोक्यात आली असल्याने रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर आणखी कमी करावेत असे म्हणणाऱ्यांनी सध्याच्या महागाईच्या दराला कमी कसे म्हणता येईल, ते आधी स्पष्ट करावे.व्याजाचे दर चढे ठेवल्याने विकासाचा वेग खुंटला, असा दोष देणाऱ्यांचा संदर्भ देऊन डॉ. राजन यांनी जून या लागोपाठ चवथ्या महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर (सीपीआय) आधारित चलनवाढीचा दर वाढून ५.७७ टक्क्यांवर पोहोचला याकडे लक्ष वेधले. विकासाला चालना देण्यात आम्ही कमी पडलो अशी चर्चा सातत्याने सुरु असते. त्याला कोणताही अर्थशास्त्रीय आधार नाही. (विशेष प्रतिनिधी)>चलवाढ कुठे कमी झाली ते सांगा...टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही, असे ठामपणे सांगत ते म्हणाले की, माझ्यावर टिका करणाऱ्यांनी आधी, सध्याची चलनवाढ व्याजदर कमी करावेत एवढी कमी झाल्याचे कसे म्हणता येईल, ते स्पष्ट करावे.>पुस्तक लेखन नाहीगव्हर्नरपदावरून पायउतार झाल्यानंतर त्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिण्याचा आपला इरादा नाही. पुस्तक लिहिलेच तर ‘तात्विक प्रश्नांवर’ लिहीन, असेही डॉ. राजन म्हणाले.