मुंबई : राज्यातल्या सगळ्या वाहिन्या, वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांचे निकाल येत होते पण राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाची कोणतीही आकडेवारी नव्हती. एकीकडे मुख्यमंत्री सरकारचे सगळे व्यवहार कॉम्प्यूटरवर झाले पाहिजेत, आॅनलाईन सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असे सांगत असताना राज्याच्या निवडणूक आयोगाने मात्र आॅनलाईन निकाल देण्याकडे पाठ फिरवली. आयोगाच्या साईटवर ‘मतदानाची आकडेवारी व निवडणूक निकाल’ असा एक पर्याय आहे, पण त्यावर क्लीक केले की काहीही येत नव्हते. जर निकाल द्यायचा नव्हता तर हा पर्याय या वेबसाईटवर का ठेवला गेला याचे स्पष्टीकरण निवडणूक आयुक्त कार्यालयाने दिले नाही. आम्ही ५ वाजेपर्यंत निकाल देतो एवढेच उत्तर त्यांच्याकडून येत होते.(प्रतिनिधी)
आयोगाकडे आॅनलाईन निकाल नाही
By admin | Published: February 24, 2017 4:05 AM