शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

आयुक्त-महापौरांत पाण्यावरून मतभेद

By admin | Published: May 17, 2016 1:52 AM

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी दिले जाते असे सांगितले

पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी दिले जाते असे सांगितले, ते अत्यंत चुकीचे असल्याची टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली. आयुक्तांनी कोणत्या अहवालाच्या आधारे ही माहिती दिली त्याची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. आयुक्तांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकारकडून अमृत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीवर परिणाम होणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या वक्तव्याला विरोध केला होता, अशी माहितीही महापौरांनी दिली. पुण्याची लोकसंख्या व खडकवासला धरणातून उचलण्यात येणारे पाणी याआधारे प्रशासनाकडून पाणी मोजण्यात चूक केली जाते. धरणातून जेवढे पाणी उचलले जाते, तेवढे पाणी पुण्याला मिळतच नाही. त्यामुळे मुळात पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी मिळते, यातच चूक आहे. त्यातील सत्यता तपासून पाहावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. आता मात्र आपण आयुक्तांनी कोणत्या अहवालाच्या आधारे हा हिशेब केला त्याची चौकशी करू, असे महापौर म्हणाले.