शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

व्हॉट्सअ‍ॅपवर आयुक्तांची शाळा

By admin | Published: January 29, 2015 5:42 AM

महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला लक्ष्यपूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत

ठाणे : महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला लक्ष्यपूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, रोज हे लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केले जात आहे, त्यासाठी काय काय उपाय योजले जात आहेत, याची सर्व माहिती ते प्रत्येक मिनिटाला मिळवण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे पहाटे ५पासून प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून अपडेट घेतले जात आहे.ठाणे महापालिकेची आर्थिक घडी बिघडल्याने पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढीच रक्कम शिल्लक असल्याची माहिती आयुक्त जयस्वाल यांना पालिका अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दिली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता. परंतु, आता त्यांनी ही विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रत्येक विभागाची शाळा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘टीएमसी एमसीस आॅफिस’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचे अ‍ॅडमिन उपायुक्त संदीप माळवी जरी असले तरी संपूर्ण ग्रुपवर आयुक्तांचा ताबा आहे. या ग्रुपवर पहाटे ५ वाजल्यापासून मेसेज धडकत असून आज कोणत्या विभागाने किती वसुली केली, वसुली का झाली नाही, किती दिवसात वसुली पूर्ण केली जाणार आहे, शहरातील कचऱ्याचा प्रश्न, टीएमटीच्या रोज किती बस रस्त्यावर धावतात, उत्पन्न किती, प्रवासी किती, याची माहितीही एका मेसेजवर आयुक्तांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोणता विभाग कशात पिछाडीवर आहे आणि कोणता विभाग आघाडीवर आहे, याची माहिती तत्काळ उपलब्ध होत आहे. यामुळे पहाटेपासूनच पालिकेच्या प्रमुख विभागांचे अधिकारी कामाला लागत असून आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षणाला तत्पर राहावे लागत आहे. आयुक्तांच्या या वेगळ्या निर्णयामुळे पालिकेतील झोपी गेलेले सर्वच विभाग आता जागे झाले असून ते कामाला लागले आहेत. (प्रतिनिधी)