शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:54 AM

मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यासंदर्भातील न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.मराठा बिझनेसमन फोरम व अखिल मराठा फेडरेशन यांच्यामार्फत आयोजित मराठा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा बिझनेसमन फोरमसारख्या विविध संस्थांनी मराठा समाजासाठी विविध शिक्षणविषयक, कौशल्य विकासविषयक योजना राबविण्यासाठी शासनासमवेत काम करावे. अशा संस्थांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येईल. मराठा समाजासाठी राज्य शासनाने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरु केली, यातून ६०२ अभ्यासक्रमात फी प्रतिपूर्ती दिली जात आहे. मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बहुतांश मराठा समाज शेती व्यवसायात कार्यरत आहे. शेतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे ४०० कोटी रुपये खर्च करुन २.५ लाख तरुणांना कृषी क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना शासनाने हाती घेतली आहे. मरणासन्न झालेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने मोठा निधी देऊन पुन्हा सक्षमपणे सुरु केले आहे. या महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांसाठी कर्जे देण्यात येत आहेत.मराठा बिझनेसमन फोरमने प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक हजार उद्योजक तयार करावेत. या तरुणांना शासनामार्फत कर्ज तथा व्याजसवलत उपलब्ध करून देऊ. मराठा बिझनेसमन फोरमने नोडल एजन्सी म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.समाजासाठी कार्य करणाºयांचा सन्मान-मराठा समाजासाठी कार्य करणाºया खारघर मराठा समाज (नवी मुंबई), रत्नसिंधू मराठा मित्रमंडळ (नाशिक), कोकण मराठा संघ (पुणे), मराठा मंडळ (इचलकरंजी), श्री कुलस्वामिनी शारकाईदेवी मंडळ (बडोदे), वंदे मातरम युवा संघटन रोडमराठा (पानिपत), तेलंगणा मराठा मंडळ या संस्थांचा सन्मान करण्यात आला. मराठा भुषण पुरस्काराने डॉ. डी. जी. हापसे, बळीराम कदम, पं. प्रशांत गायकवाड, ललिता बाबर, शंकरराव कोल्हे, कमलकिशोर कदम, प्रा. नरेंद्र विचारे यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा