मुंबई : जागेच्या अभावाची कारणे देत एल. एस. रहेजा महाविद्यालयाने फाउंडेशन आणि फाइन आर्ट अभ्यासक्रम तात्पुरते स्थगित केले आहेत. यासंदर्भात विद्यार्थी भारतीने पुकारलेल्या आंदोलनानंतर कला संचालनालयाने चौकशी समितीची स्थापना केली आहे.कला महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एल.एस रहेजा महाविद्यालयाने ‘फाऊंडेशन’ आणि ‘फाईन आर्ट’ या अभ्यासक्रमाला जागेच्या अभावामुळे तात्पुरती स्थगिती दिली आहे. याप्रकरणी विद्यार्थी भारती संघटनेने याविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. फाउंडेशन आणि फाइन आर्ट या अभ्यासक्रमासाठी रहेजा महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होणार आहे. परिणामी हे अभ्यासक्रम सुरू ठेवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. कला संचालक संजीव मिश्रा यांनी याबाबत एल. एस. रहेजा महाविद्यालयाशी पत्रव्यवहार केला असून, संघटनेच्या मागणीनंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, फाउंडेशन आणि फाइन आर्ट हे स्थगित अभ्यासक्रम २५ जुलैपर्यंत सुरू होतील. या अभ्याक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासन कला संचालक राजीव मिश्रा यांनी विद्यार्थी भारतीला दिले आहे. (प्रतिनिधी)>‘विकास फी’च्या नावाखाली लूटअभ्यासक्रमाविषयी नाराजी असतानाच विद्यार्थ्यांकडून विकास फीच्या नावाखाली अधिक रक्कम आकारली जात आहे. याविषयीची अधिक चौकशी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येणार आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले.>या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- राजीव मिश्रा, कलासंचालक
रहेजा महाविद्यालयाच्या चौकशीसाठी समिती
By admin | Published: July 21, 2016 2:24 AM