पनवेल : नवी मुंबईतील कांदळवन संरक्षणासाठी शुक्रवार, ३ मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या सनियंत्रित समितीच्या संरचनेत उच्च न्यायालयाने सूचित केल्याप्रमाणे बदल करण्यात आला आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, आता मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुनर्गठीत समितीच्या अध्यक्षपदी कोकण विभागीय आयुक्त असतील. त्याशिवाय, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, अप्पर आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, महाव्यवस्थापक पर्यावरण व वने सिडको, विभागीय वन अधिकारी मुंबई कांदळवन संधारण घटक, नवी मुंबई पर्यावरण संवर्धन समिती यांचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी नामनिर्देशित केलेल्या आणि पर्यावरण क्षेत्रात काम केलेल्या अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून काम करतील, तर मुख्य वनसंरक्षक, मुंबई हे सदस्य सचिव म्हणून काम करतील. विशेष म्हणजे कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तिथे सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव तत्कालीन कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी दिला होता. (प्रतिनिधी)
कांदळवन संरक्षणासाठी समितीचे पुनर्गठन
By admin | Published: March 03, 2017 2:39 AM