शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समिती

By admin | Published: August 10, 2015 1:12 AM

लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीवर तरुणाकडून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीवर तरुणाकडून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. याची गंभीर दखल रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सात दिवसात अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात नवीन निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय (लोहमार्ग) यांनी लोकमतशी बोलताना दिली.गुरुवारी रात्री बोरीवली ते चर्चगेट या जलद लोकलमधून जाणाऱ्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न तरुणाने केला. या प्रकरणी आतापर्यंत २0 हून अधिक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त (लोहमार्ग)मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा आम्ही घेणार आहोत. यासाठी एक पोलिस उपायुक्त आणि एक महिला सहाय्यक पोलिस आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यानंतरच महिला डब्यातील सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महिला डब्यातील सुरक्षा वाढवणे, सध्याच्या वेळेत बदल करणे याबाबत समितीने सादर केलेल्या अहवालनंतरच निर्णय घेण्यात येईल.