पुणे - पुण्यातील काही डॉक्टरांनी रक्त पातळ करण्यासाठी वापरले जाणारे एक औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याचे म्हटले आहे. या डॉक्टरांनी परीक्षण आणि रुग्णांमध्ये दिसून आलेल्या परिणामांच्या आधारे हा दावा केला आहे. डॉक्टरांनी म्हटले आहे, की लो मॉलिक्यूलर वेट हेपरिन (LMWH) नावाच्या इंजक्शनने कोरोना रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. तसेच, त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यात मदत होते. या शिवाय या औषधाने अनेक रुग्ण रिकव्हरही झाले आहेत.
अनेक रुग्णांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर, डॉक्टरांनी या औषधासंदर्भात मांध्यमांना माहिती दिली. यावेळी डॉक्टरांनी सांगितले, की SARS-CoV2 व्हायरसमुळे रुग्णांच्या शरीरात काउंटर ब्लड इंफ्लेमेशन आणि ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण व्हायरला लागते. हे रोखण्यासाठी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे दिसत आहे.
इटालीतील रुग्णांच्या अध्ययनातून मिळाली मदत -नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुभल दिक्षित यांनी दावा केला आहे, की इटाली येथून आलेल्या रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे, की कोरोना व्हायरसमुळे, शरीरात छोटे ब्लड क्लॉट्स तयार होतात. अशात डॉक्टरांनी भारतात रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करायलाही सुरूवात केली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच गंभीर रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्यात येत आहे. तसेच आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने या औषधाचा वापरही वाढवण्यात आला आहे. तसेच हे औषध प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे.
ब्लड क्लॉट्समुळेच अनेक गंभीर समस्या -डॉ. दिक्षित यांनी म्हटले आहे, की फुफ्फुसाच्या नसांत ब्लड क्लॉट तयार झाल्याने, अनेक वेळा श्वास घेण्यास त्रास होतो. या शिवाय, हार्ट, ब्रेन आणि किडनीमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळेच हार्ट अॅटॅक, ब्रेन स्ट्रोक्स आणि अॅक्यूट किडनीची समस्याही निर्मण होते. अशात लो मॉलेक्यूलर वेट हेपरिनचा वापर (LMWH) परिणामकारक दिसत आहे. यावर आणखी संशोधन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन
मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार