ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16- राज्य सरकारने विविध वस्तूंवरील मूल्यवर्धिक कर म्हणजे व्हॅटमध्ये दीड टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने सर्वसामान्याना चांगलाच दणका दिला आहे. या निर्णयामुळे सरकारला जवळपास ६०० कोटींचा अतिरिक्त महसूल व्हॅटमध्ये करण्यात आलेल्या या वाढीमुळे मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे डिझेलवरील व्हॅटमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. डिझेलवरील व्हॅट वाढवला तर शेजारील राज्यांची विक्री वाढेल या भितीने डिझेलवर व्हॅटवाढ केली नाही. जून महिन्यात पेट्रोलच्या दरांमध्ये घट झाली होती. मात्र आता व्हॅटमध्ये वाढविण्यात आल्यामुळे पेट्रोलच्या किमतीतही फरक पडणार आहे.