शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

मुख्यमंत्री साधणार प्रशिक्षणार्थींशी संवाद

By admin | Published: September 22, 2016 5:23 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींसोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या उपक्रमात राज्यातील ५६ शासकीय आयटीआयची निवड करण्यात आली असून खासगी आयटीआयला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खासगी आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश प्रक्रियेत ८६ हजार २६४ प्रशिक्षणार्थींनी शासकीय आणि ३० हजार ७८४ प्रशिक्षणार्थींनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले. प्रशिक्षणार्थींना विविध ७८ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्कील इंडिया’ या योजनेबाबत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळायला हवी. मात्र प्रशासनाने दुजाभाव करत खासगी आयटीआयबाबत पुन्हा दुजाभाव केल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिग सुविधा असल्यानेच पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय आयटीआयची निवड केल्याचा खुलासा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केला आहे. भविष्यात खासगी आयटीआयचीही निवड केली जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले. तूर्तास तरी शासनाच्या विभागस्तरावर हा निर्णय झाला असल्याने कोणीही रागवण्याचे कारण नाही, असे आवाहन संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.