शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पूरग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देणार

By admin | Published: September 24, 2016 2:57 AM

फडणवीस यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पूर ग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळून देण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले.

डहाणू : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या मालमत्तेची प्रशासनामार्फत पाहणी आणि पंचनामे झाल्यानंतर त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पूर ग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळून देण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले.ते शुक्रवारी तारापूर, चिंचणी, वरोर, वाढवण, धाकटी डहाणू, बहाड या किनारपट्टी भागातील पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी आले होते. या वेळी त्यांच्या समवेत खासदार अ‍ॅड.चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भरत राजपूत, अशोक अंभीरे, विलास पाटील, विवेक कोरे, तहसीदार प्रीतीलता कौरथी माने, अशोक जोशी, विपुला सावे, मंजुषा चुरी, अब्दुल गफुर शेख हे होते. या वेळी त्यांनी चिंचणीच्या मुस्लीम मोहल्ला, वोशेरा तलाव, नागेश्वरी परिसर पाण्याखाली गेल्याने त्याला चिंचणी येथील मराठी शाळा नं. १ मध्ये हलविण्यात आले होते. तेथे जाऊन त्यांनी त्यांची विचार पूस केली. तेथून ते वरोर, बहाड, तडीयाळे, धाकटी डहाणू या रस्त्यावरील गावांची पाहणी केली. सेंटमेरीज हायस्कूलच्या पाठीमागे पाण्याखाली गेलेली वस्ती तसेच चंद्रिका हॉटेल, इराणी रोड रस्त्यावरील भागात पाहणी केली. (वार्ताहर) >वाढवणकडे पाठया वेळी मंत्री विष्णू सावरा हे सर्वाधिक नुकसान झालेल्या आणि रस्ता वाहून गेलेल्या वाढवण टीघरेपाडा भागात मात्र फिरकलेच नाहीत. तारापूर खाडीत पुराच्या पाण्यात वाहून जावून मृत्यू झालेल्या चिंचणीच्या सोनू रामबहादूर यादव या तरुणाच्या घराकडे ही त्यांनी पाठ फिरवली.