शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

केबल घोटाळ्याबाबत तक्रार दाखल

By admin | Published: June 05, 2017 3:02 AM

केबलचालकांच्या विरोधात आयकर विभागाकडे ३०० पानांच्या भरभक्कम पुराव्यासह तक्रार दाखल झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जनतेकडून विनापावती रक्कम घेऊन कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणाऱ्या येथील केबलचालकांच्या विरोधात आयकर विभागाकडे ३०० पानांच्या भरभक्कम पुराव्यासह तक्रार दाखल झाली आहे. विनापावती रक्कम वसुलीची चौकशी करण्यासाठी वैधमापन विभागानेही विशेष मोहीम उघडली आहे.या केबल घोटाळ्याची चौकशी जिल्हा प्रशासनामार्फत आधीच सुरू आहे. आता आयकर विभागाकडेही तक्रार दाखल झाल्याने या केबल घोटाळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले झाले आहे. केबल चालकांनी करमणूक विभागाकडून परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच अलिबागच्या तहसीलदारांना नोटीस बजावली होती. या तफावतीबाबत त्यांचे स्पष्टीकरणही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविले आहे. अलिबाग येथील केबलचालक ग्राहकांना गेली १० वर्षे कोणत्याही प्रकारची पावती न देता, ग्राहकांकडून विनापावती फी व विक्र ीकर वसूल करीत असल्याचे तहसीलदार अलिबाग यांच्या अहवालावरून सिद्ध झाले आहे. ते वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आयकर, विक्र ीकर विभागाचे कर बुडवून कमवित असल्याने त्यांच्या अवैध उत्पनाची चौकशी होण्याबाबत तीनशे पानांच्या भरभक्कम पुराव्यांसह आयकर विभागाकडे आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी तक्र ार दाखल केली आहे. या तक्र ारीमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे येथील केबलचालकाने आता केबल व्यवसाय हा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी त्यांच्या पत्नीने अलिबाग नगरपरिषदेची २०१६ची सार्वत्रिक निवडणूक लढविली आहे. त्या नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्यांनी त्या वेळी निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर करताना या केबल व्यवसायाविषयी काहीही नमूद केलेले नसल्याचे सावंत यांनी तक्र ारीत म्हटले आहे. तसेच याच प्रतिज्ञापत्रात त्यांनी आयकर भरत नसल्याचे त्यांनी लिहून दिले आहे. त्यांनी त्यांच्या पतीचे व त्यांचे स्वत:चे पॅन कार्ड नंबरही नमूद केलेले नाहीत. आयकर विवरण व पॅन कार्ड नंबर दर्शवित नसल्याने त्यांची व त्यांच्याशी संबंधित सर्वांची करचुकवेगिरी उघड होते, असे सावंत यांनी सांगितले.