मुंबई : वैद्यकीय पदवी शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण केल्यावर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरलाच पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार आहे. पण २0१२ पासून अनधिकृतरीत्या पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करणार्या डॉ. व्ही. झेड. बेलानी आणि त्यांच्या क्लिनिक्सच्या विरोधात २ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) तक्रार दाखल झालेली आहे. पॅथॉलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरालाच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा आणि पॅथॉलॉजी रिपोर्टवर सही करण्याचा हक्क महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेला आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरू करायची असल्यास नोंदणी करावी लागत नाही, याचाच गैरफायदा उठवत टेक्निकल शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती, अशिक्षित व्यक्तींचा खुलेआम स्वतंत्ररीत्या पॅथॉलॉजी लॅब सुरू करून निदानाचा काळाबाजार सुरू आहे. डॉ. व्ही. झेड. बेलानी यांच्याविरोधात एकाने तक्रार दाखल केली आहे. डॉ. बेलानी यांच्या मुंबईत चार क्लिनिक्स आहेत. तक्रारदार कुलाब्याच्या क्लिनिकमध्ये २0१२ पासून जात आहे. तक्रारीत असे नमूद केले आहे, की २0१२ पासून आतापर्यंत या क्लिनिकमधून मिळालेल्या रिपोर्ट्सवर शैक्षणिक पात्रता नसलेली व्यक्तीच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी) जिवाशी खेळ र८ेु'>च्/र८ेु'>या क्लिनिकमध्ये दररोज अनेक व्यक्ती तपासणीसाठी येत असतात. त्यांना अशाच प्रकारे रिपोर्ट्स दिले जातात, ही गोष्टी चुकीची असून रुग्णांच्या जिवावर बेतणारी आहे. म्हणून या डॉक्टरवर कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे. 'लोकमत'कडे या तक्रारीची कॉपी आहे. डॉ. बेलानी यांच्या ब्लू शिल्ड मेडिकल क्लिनिकमधून मिळणार्या रिपोर्टवर डॉक्टरची नावे बदलेली आहेत, पण सही एकच आहे. फॉर म्हणून डॉक्टरांचे नाव लिहिले जाते, असे ही तक्रारदाराचे म्हणणे आहे.
डॉक्टरच्या विरोधात एमएमसीमध्ये तक्रार
By admin | Published: February 09, 2015 8:03 AM