सोलापूर : मनपातील भ्रष्टाचाराबाबत भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे गुरूवारी तक्रार केली. आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी पहाटे श्री विठ्ठलाच्या महापूजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. दुपारी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची माहिती दिल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष निंबर्गी यांनी सांगितले. सभागृहाने ठराव केलेला असतानाही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर गतवर्षीच्या बजेटमधील शिलकीचे १९ कोटी रुपये परस्तर इतर कामांसाठी वळते केले आहेत. या कामाला आपण हरकत घेतली असून, याबाबत मुख्यमंत्र्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. बहुमताच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो असा गोंंधळ सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. आयुक्तांवर दबाव आणून अनेक बेकायदेशीर कामे केली जात आहेत. नियमबाह्यपणे करण्यात येत असलेल्या अनेक कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. पुढील आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक घेऊ. त्यात महापालिकेच्या कामाबाबत चर्चा करू असे आश्वासन दिले आहे.
सोलापूर मनपातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
By admin | Published: July 14, 2016 7:01 PM