शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

प्रकल्पग्रस्तांना पूर्ण भरपाई

By admin | Published: December 24, 2016 3:56 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊनच रस्ता रुंदीकरणाची कामे केली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. तसेच, २७ गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले असून, वाढीव पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय मंगळवारी आयोजित बैठकीत होणार आहे.कल्याण-शीळ रस्त्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टप्पा, चक्की नाका ते नेवाळी रस्ता तसेच मानपाडा रोड या तीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचे काही आक्षेप होते. त्यासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे बीएसयूपीची घरे असून, त्यात रस्तेबाधितांना स्थलांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध असून, त्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली. तसेच, महापालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्पची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. मानपाडा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने सर्वेक्षण करून प्रकल्पबाधितांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले असून, कमीतकमी बाधित होतील, अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)