मुंबई- भाऊच्या धक्क्याजवळच्या बुचर द्विपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना लागलेल्या आगीवर आज अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बत 40 तासांनी म्हणजेच तीन दिवसांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली आहे. सध्या जवाहर द्विपावर कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे.या आगीमध्ये तेलाच्या टाक्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागण्याच्या घटनेला 15 तासांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र हे अग्नितांडव शमलेले नाही. जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे. ही आग मोठी असल्यानं तिच्यावर 40 तासांनी नियंत्रण मिळवलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही ठोस मिळालेली नाही. मात्र टाक्यांवर वीज कोसळून लाग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. 13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली होती.या बेटावर 15 ते 20 टँक आहेत. त्यापैकी 12 नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्विपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली होती. काही वेळातच ही आग भडकली. आता समुद्रात आग विझवण्यासाठी बंब कसे न्यायचे यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
जवाहर द्विपावरील बीपीसीएल टँकरला लागलेल्या आगीवर पूर्णतः नियंत्रण, कूलिंग ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 4:34 PM