मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्यांतर्गत भाडेकरूंची संख्या ४६ हजार ५६३ असून, या सर्वांची माहिती येत्या ३ महिन्यांत पालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध केली जाणार आहे. भूखंडाचा कालावधी, त्याचे भूभाडे, मक्तेदाराची माहिती, अतिरिक्त भाडे, नियम आदींबाबतचा सविस्तर तपशील त्यावर असणार आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मालमत्ता विभागाकडे भाडेकरूंची संख्या व वसूल होणाऱ्याची रकमेबाबत माहिती विचारली होती. त्यावर त्यांना कळविण्यात आले की, शहर व उपनगरात पालिकेच्या मालमत्तेतील भाडेकरूंची संख्या ४६ हजार ५६३ इतकी आहे. २०१५-१६ या कालावधीत भाड्याची एकूण रक्कम १८ कोटी २६ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. त्यापैकी ११ कोटी २२ लाख १२ हजार ६७७ रुपये इतके भाडे वसूल झाले आहे. २०१४पासून भाडेकरूचे नाव आणि भाड्याची रक्कम असते परंतु त्यावर भाडे वसुली व थकबाकीचा तपशील नसतो. पालिकेच्या प्रत्येक विभागाने मालमत्ता विभागाचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सामान्य नागरिकांना वेळेवर माहिती मिळेल, अशी मागणीही अनिल गलगली यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
भाडेकरूची संपूर्ण माहिती ३ महिन्यांत वेबसाईटवर
By admin | Published: November 02, 2016 1:59 AM