हुसेन मेमन,
जव्हार- शहरात दरवर्षाप्रमाणे यंदाही हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस बुधवार, गुरूवार व शुक्रवार या तिन दिवसांचा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ऊर्स जल्सा कमेटीचे अध्यक्ष मोहसीन चाबुकस्वार, उपाध्यक्ष मोईन मनियार व आश्पाक पठाण, सेक्रेटरी जुबेर मेमन, रहिम लुलानिया, तंझीम परिजादा आदिंनी खुप मेहनत घेतली.उरूसाचा पहिला दिवशी जामा मस्जिद येथून भव्य मिरवणूक निघाली, मस्जिदपासुन पाचबत्तीनाका व नेहरूचौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदल वाटप करण्यात आला. या महोत्सवात दुसऱ्या दिवश महत्वाचा मानला जातो दुसऱ्या दिवशी भव्य चादर जामा मस्जिदीपासुन मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली. या मध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात रातिफ करण्यात आला. मुरीद व फकीर यांनी नानाविध प्रकार यावेळी केले. तलवार, खंजीर चे वार आपल्या आंगावर करणे, सळई वा जाड तारा खुपसणे या सारखे थरारक प्रकार यावेळी करण्यात आले. मात्र औलिया पीर यांच्या करामतीमुळे रक्ताचा एकही थेंब निघाला नाही, हे यांचे वैशिष्ट्य. हा रातिफचा सोहळा ढोल ताशे, नगारे यांच्या वाद्यांत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पाचबत्तीनाका, नेहचौक, व त्यानंतर गांधीचौक व परत दर्गाह असा हा मिरवणूकीचा प्रवास असतो. हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढविण्यात आली. सर्व धर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या. त्यानंतर उर्स कमेटी तर्फे लंगर चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पहाटे पर्यत चालणारा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कव्वालीस जवळ जवळ १ लाख ३० हजार चाहत्यांनी हजेरी होती. खास करून या रात्री जव्हार बसस्थानकातही सकाळ पर्यत जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. जव्हार व परिसरांतील असंख्य मान्यवर मंडळी व आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने कव्वालीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.तिसऱ्या दिवशी म्हणजे नवमीस सायंकाळी ख्वाजापिर यांचा संदल वाटपाचा कार्यक्रम राजेसाहेबांच्या उपस्थितीत झाला. यावेळी देखील असंख्य नागरिक उपस्थित होते. असा हा हजरत औलिया पीर शाह सदरोद्दिन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस दरवर्षी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने हा ५६४ वे वर्र्षाचा उरूस महोत्सव साजरा केला.दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव तसेच एस. टी. स्टॅन्डजवळील परिसर गजबजलेला आहे. आकाशपाळणे, वेगवेगळे खेळ, मौत का कुआ प्रदर्शने, विविध प्रकारचे स्टॉल, खेळणीची दुकाने मोठ्या संख्येने असतात. बरीचशी मंडळी बाहेरगांवाहून खास या उरूसासाठी उपस्थित होते. राजेशाही नसली तरी आजही ही परंपरा हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने पाळत असल्यामुळेच जव्हारच्या उरूसला ही आगळी वेगळी शान आहे. या महोत्सवात पोलिसांचाही चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३०० पोलिस कर्मचारी व ३० अधिकारी नेमण्यात आले असल्याचे जव्हारचे पोलिस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.>हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीकयंदाच्या उरूसात येणाऱ्या पाहुण्यांना व गावकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून, या तिन्ही दिवसात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षात घेण्यात आली. यात हिंंदु-मुस्लिम बांधवांनी सहर्काय केले. तसेच पोलिसांनीही चोख बंदोस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व कार्यक्रम हे सुरळीत पार पाडण्याकरीता उर्स जल्सा कमेटीच्य व सुन्नी मुस्लीम कमेटीच्या सदस्यांच्या मदतीने हा उत्सव हिंदु-मुस्लिम एकोप्याने साजरा करण्यात आला, अशी माहिती उर्स जलसा कमेटीचे अध्यक्ष मोहसीन चाबुकस्वार यांनी लोकमतला दिली.