लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य शासनाच्या संगणकीय सातबारा योजनेंतर्गत राज्यातील खातेदारांची अचूक माहिती संगणकीय करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असून, १ आॅगस्ट, महसूल दिनापासून संगणकीय सातबारा वितरण करण्याच्या सूचना राज्याचे जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत. चोक्कलिंगम यांनी शनिवारी नाशिकला भेट देऊन सातबारा संगणकीकरणाचा आढावा घेतला. राज्यातील सातबाराचे संगणकीकरण करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यात ९४ टक्के काम पूर्ण झालेले आहे. आगामी सहा टक्के काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे, तर ज्या सातबारा उताºयाचे संगणकीकरण झालेले आहे त्याच्या दुरुस्तीसाठी गावोगावी चावडीवाचन करण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या. २५ जुलैपर्यंत वाट न पाहता येत्या १० जुलैपर्यंत संगणकीय दुरुस्त्या पूर्ण करण्यात याव्यात व आॅगस्ट महिन्यात प्रत्यक्ष खातेदाराला सातबारा हातात मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, चोक्कलिंगम यांनी नाशिक जिल्ह्याच्या डिजिटल मॅपिंग संदर्भातही भूमी अभिलेख खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सहा जिल्ह्णांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल मॅपिंग केले जात आहे त्यात नाशिकचा समावेश आहे. संगणकीकरण अपूर्णनाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नाशिक तालुक्यात संगणकीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या दोन्ही ठिकाणी खातेदारांची संख्या अधिक असून, त्यातही पुन्हा वाणिज्य वापराच्या जमिनी अधिक असल्याने त्याची माहिती संकलित करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
१ आॅगस्टपासून संगणकीय सातबारा
By admin | Published: July 01, 2017 11:23 PM