शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

महिनाभरात सातबारा होणार संगणकीकृत

By admin | Published: April 07, 2017 5:56 AM

महिनाभरात राज्यातील सर्व सातबारांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल

मुंबई : महिनाभरात राज्यातील सर्व सातबारांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सातबारांचे संगणीकरण झाल्यानंतर व्यवहारातील गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महसूल अधिका-यांशी संगनमत करुन बोरीवली येथील सर्व्हे क्रमांक २०९ मधील तब्बल १४ एकरचा भूखंड हडपण्यात आल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. अधिका-यांशी संगनमत करुन तब्बल ८० वर्षे ज्याने शेती कसली त्याला भूमीहीन करण्यात आले. शिवाय, झोपडपट्टी पुर्नवसन योजनेत मोठ्या प्रमाणावर झोपडीधारकांची फसवणूक केली जात आहे, अशा सर्व गैरप्रकारांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परब यांनी यावेळी केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री पाटील म्हणाले की, बोरीवली येथील समस्या ही खोतीसंदर्भातील आहे. या प्रकरणात मूळ मालकांचे नाव सातबा-यावर आणावे, यासाठी ९ मार्च २०१७ रोजी बोरीवलीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल आहे. विषय खूप गुंतागुंतीचा असल्याने सभापतींच्या दालनात बैठक घेऊ, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)>सफाई कामगारांना हक्काची घरे देणारसफाई कामगारांच्या वसाहतींचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेतर्पेष्ठ आश्रय योजना व सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचा-यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून सेवा कालावधीत सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.