नाशिक : लघु आणि मध्यम उद्योगातूनच स्थानिक युवकांना बेरोजगार मिळतो. त्यामुळे या उद्योगांसाठी शासन खास धोरण तयार करीत असून, ९ मे रोजी मुंबईत त्याचे धोरण जाहीर केले जाईल, अशी घोेषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे केली. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून, त्यामुळे उद्योगांना सवलतीचे धोरण जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नदीपात्रालगत कारखाने उभारणीसाठी असलेल्या नियंत्रणाचा कायदाच कॅबिनेटच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे. तसेच केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्यातून औद्योगिक महामंडळाला वगळण्यात आले असून, दोन वर्षांपासून ठप्प असलेल्या भूखंड आरक्षणाच्या अधिसूचनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी नाशिक इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या निमा इंडेक्स २०१५ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.जर्मन उद्योग महाराष्ट्रात भागीदारी करण्यास उत्सुक असून, त्यामुळे उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेक इन महाराष्ट्र’साठी उद्योगांना सवलती
By admin | Published: April 25, 2015 4:00 AM